PostImage

सुपर फास्ट बातमी

Today   

PostImage

सावधान गडचिरोली शहरातील मुख्य बसस्थानकावर चोरीचे प्रमाण वाढले पोलिस उप …


 

 

 गडचिरोली मुख्य बस स्थानकावरून चोरी गेलेल्या मोबाईलची अवघ्या दोन तासात लावला शोध

 

  काहि बस कर्मचाऱ्याकडून गडचिरोली स्थानिक बस टॉप मधिल सीसीटिवी कॅमेरे बंद असल्याचे कळाले

 

दिंनाक : 05/09/2024

 

गडचिरोली: गडचिरोली शहरातील मुख्य बसस्थानकावरून दूपारी 3 वाजता ललिता किशोर बोटकेवार रा. नागपूर, नागपूर बस मध्ये चळतांना त्यांच्या लक्षात आलं की त्यांची पर्स चोरीला गेली आहे.लगेच गडचिरोली पोलीस स्टेशन गाठून उप निरीक्षक दिपक चव्हाण यांना माहिती दिली असता लगेच त्यांच्या टिमने चौकशी करून अवघ्या दोन तासात मोबाईल चा शोध लावला.

 

सदर बातमी या प्रमाणे आहे कि ललिता किशोर बोटकेवार रा. नागपूर हि महिला काहि कामानिमित्त मूल ता सावली येथे बुधवार ला गेली व गुरूवार ला आपल काम आटोपून सदर महिला सावली वरून गडचिरोली बस स्थानकावर दूपारला 2 च्या दरम्यान पोचली असता नागपूर बस हि 3 च्या दरम्यान नागपूर बस मध्ये बसली असता तिकिट काढण्यासाठी बॅग मध्ये पर्स बघित असतानां त्यांच्या लक्षात आल कि पर्स चोरीला गेली आहे त्या पर्स मध्ये मोबाईल व काही पैसे होते.लगेच बस स्थानकातील चौकशी विभाग येथे माहिती दिली असता त्यांनी त्या प्रवासीला कुठल्याही प्रकारची सहकार्य न करत तूमची वस्तू चोरी झाली तर आम्ही काय करू? हे तर दरोजचेच आहे अस मनून हाथ वर केले.

 

हि घटना युवा मराठा न्यूज गडचिरोली जिल्हा अध्यक्ष सूरज गुंडमवार यांना माहिती मिळतांच लगेच त्या महिलेला स्थानीक पोलिस स्टेशन गडचिरोली येथे जावून पोलिस उपनिरीक्षक दिपक चव्हाण यांना माहिती दिली लगेच उपनिरीक्षक साहेब व त्यांच्या टिम ने चौकशी सूरू केली व लोकेशन ट्रेस करून अवघ्या दोन तासामध्ये त्या चोरी गेलेल्या पर्स चा शोध लावून त्या महिलेला वापस दिले त्या महिलेने उपनिरीक्षक दिपक चव्हाण व त्यांच्या टिम चे आभार मानले.

 

यावेळी पुढिल तपास उपनिरीक्षक दिपक चव्हाण,पोलिस हवालदार मेश्राम ,बेसरा,पोलिस नाईक,चौधरी,पोलिस शिपाई गवडकर ,हिचामी ,पूरी,खोब्रागडे करित आहेत.


PostImage

Zadipatti VC News and Business

Yesterday   

PostImage

गडचिरोली जिल्हा शिक्षक सेल तर्फे शिक्षक दिन साजरा


 

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा काँग्रेस शिक्षक सेलच्या वतीने जिल्हा कार्यालयात शिक्षकदिन साजरा करण्यात आला. यावेळी  डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण  यांना अभिवादन करून सेवा निवृत्त जेष्ठ शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हूणन गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, जिल्हाध्यक्ष शिक्षक विभाग दत्तात्रय खरवडे,काँग्रेस नेते हसनभाई गिलानी,  महासचिव देवाजी सोनटक्के, शिक्षक सेल दत्तात्र्यय खरवडे, जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस वामनराव सावसाकडे, नदीमभाऊ नाथानी, काशिनाथ भडके, शिक्षक सेल कार्याध्यक्ष दीपक रामने,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेट्टी, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली वसंत राऊत, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी आरमोरी मिलिंद खोब्रागडे, महिला तालुकाध्यक्ष  कल्पनाताई नंदेश्वर, शंकरराव सालोटकर,सुनील चडगुलवार, जिल्हाध्यक्ष ग्राहक संरक्षन विभाग भरत येरमे, माधवराव गावड,जिल्हाध्यक्ष परिवहन विभाग रुपेश टिकले, जिल्हाध्यक्ष अ. जा. विभाग रजनीकांत मोटघरे, शालिग्राम विधाते,मिथुन बबनवाडे , सरपंच नीलकंठ निखाडे,पुष्पलताताई कुमरे, डॉ. सोनलताई कोवे, अपर्णाताई खेवले,निवृत्ताताई राऊत, रिताताई गोवर्धन, पोर्णिमाताई भडके, संध्या रामने,संगीताताई बारसागडे, निर्मलाताई आदे, शोभाताई कापडे, उत्तम ठाकरे, अनिल डोग्रा, गौरव येणप्रेड्डीवार, विपुल येलटीवार, कुणाल ताजने,छत्रपती मडावी, लहूकुमार रामटेके, प्रफुल आंबोरकर,चारुदत्त पोहाणे,दिवाकर निसार, नेताजी गावतुरे, ढिवरू मेश्राम, रामदास टिपले,कवडू उंदीरवाडे, प्रभाकरराव वासेकर, नां. मो. ठाकरे, विलास म्हस्के,आय.बी.शेख, डी. एन. मडावी, प्रशांत राऊत, संदीप राऊत, अशोक बोहरे, जितू पोटे, विवेक घोंगडे, अभिजीत धाईत,करकाळे, पंकज कावळे,अशोक पेदापल्लीवार, परशुराम तलांडे, संजय कुमरे, सुनील करपते, संतोष पेदापल्लीवार, दिलीप झाडे, भारत मोहुर्ले, गजानन सोनटक्के, नाजूक कावडे, रमेश राणे, प्रकाश शिंदे, लोमेश  म्हशाखेत्री, जालिंद भोयर, नारदेलवार, गुलाबराव मडावी, हंसराज उंदीरवाडे, ईश्वरदास राऊत, प्रदीप भैसारे सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Yesterday   

PostImage

कोकडी येथील मुलाचा नदीमध्ये बुडून मृत्यू


देसाईगंज : प्राप्त झालेल्या माहितीनूसार हर्ष गुणाजी बनसोड मू. कोकडी (तुळशी) पोलीस शिपाई रीतुराज लंजे यांचा भाचा वय 11 वर्ष हा गौरी पूजनच्या निमित्याने तो गावांतील महीला सोबत नदीवर गेला होता.

 

त्या नदीमध्ये मित्रासोबत पोहताना अचानक बुडून मृत्यू झाला. ही घटना 6/9/2024 रोजी सकाळीं अंदाजे 11,12 .00 वाजता घडली . अश्या अचानक घडलेल्या घटनेमुळे बनसोड परिवारावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त केलं जातं आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Yesterday   

PostImage

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बुध्द विहाराचे लोकार्पण


उदगीर येथील तळवेस परिसरातील नवनिर्मित विश्वशांती बुद्ध विहाराचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते  ( दि. ४) लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, विशेष अतिथी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले आदी उपस्थित होते.

 

कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार विक्रम काळे, रमेश कराड, अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचीही उपस्थिती होती.

सुरूवातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण, फीत कापून विहाराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती यांनी विहारातील गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बुद्ध वंदना झाली. वंदनेनंतर उपस्थित बौद्ध भिक्कूंना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू चिवर दान केले. बौद्ध भिक्कू यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना गौतम बुद्धांची मूर्ती भेट दिली. क्रीडा मंत्री बनसोडे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

 

विहाराची वैशिष्ट्ये

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते आज लोकार्पण झालेले उदगीर येथील विहार कर्नाटक येथील कलबुर्गीच्या बुद्ध विहाराची प्रतिकृती आहे. एक हेक्टर १५ जागेवर या विहाराची उभारणी करण्यात आली आहे. विहारात १२०० अनुयायांची बैठक व्यवस्था असलेले ध्यान केंद्र तयार करण्यात आले आहे. विहार परिसरात प्रवेश करण्यासाठी एक मुख्य प्रवेशद्वार तयार करण्यात आले आहे. या प्रवेशद्वाराची रचना बिहारमधील सांची स्तूपाप्रमाणे करण्यात आली आहे.

 


PostImage

P10NEWS

Sept. 6, 2024   

PostImage

मुजोच्या गटाला दिलेल्या सर्व कामांची तात्काळ चौकशी करा कारवाई न …


 

 

     

   

      गडचिरोली / प्रतिनिधी दि. ६/९/२०२४:-   येथील प्रतिष्ठित, लाचार  होऊन  पैशासाठी कामं करणाऱ्या मुकुंद जोशी यांच्या गटाला  विना टेंडर दिलेल्या सर्व कामांची जिल्हा प्रशासनाने तातडीने चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी सैनिक समाज पार्टीचे  प्रदेशाध्यक्ष ॲड. शिवाजी डमाळे,  विभागीय  युवा अध्यक्ष  निरज कांबळे ,  महिला प्रदेशाध्यक्ष जयश्रीताई पाटील ,  महासचिव ईश्वर मोरे , कार्याध्यक्ष एच.बी उराडे ,  गडचिरोली विधानसभा प्रमुख पुरुषोत्तम सलामे, यांनी मुख्यमंत्री ,  उपमुख्यमंत्री , जिल्हा प्रशासन आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे . .
  या बाबत सविस्तर वृत्त असे की, मुकुंद जोशी यांनी.... स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून SNCU अंतर्गत २०१२ ते २०१८  मध्ये  जिल्हा सामान्य रुग्णालयात बाह्यस्त्रोतांने  कर्मचारी पुरवठा करण्याचे काम केलेले आहे.  तसेच गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयात  २०१९ पासून २०२४  पर्यंत काम सुरू आहे. यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ईपीएफ, ईएसआयसी आणि करारानुसार बॅंक खात्यात पैसे जमा केले नाही.   नियमानुसार ई टेंडर प्रक्रिया करणे आवश्यक होते . परंतु केवळ कोटेशनवर  लाखो रुपयांचे कंत्राट देण्याचे काम संबंधित प्रशासकिय अधिकारी आणि  लिपीक  यांनी केले आले.   संबंधित व्यक्तीला धोबीचेही कंत्राट  विना टेंडर दिले आहे  . प्रत्यक्षात काम न करता  जिल्हा  सामान्य रुग्णालयातील  तसेच महिला व बाल रुग्णालयातील प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या  डोळ्यात धुळ झोकून स्वताच्या स्वार्थासाठी लाखो रुपयांची उचल करून  शासनाला  लाखो रुपयांचा चुना लावला आहे .  विना टेंडर सतत काम  देणाऱ्या   प्रशासकीय अधिकारी आणि संबंधित लिपीकावर  उचित कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सैनिक समाज पार्टीचे वतीने  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य संचालक, आरोग्य सचिव ,  जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली , जिल्हा पोलिस अधीक्षक , उपविभागीय पोलिस अधिकारी,  उपसंचालक आरोग्य सेवा संचालनालय नागपूर विभाग नागपूर यांच्याकडे केली आहे. अशी माहिती गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सैनिक समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.


PostImage

P10NEWS

Sept. 6, 2024   

PostImage

उपमुख्यमंत्री अजित पवार आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर


उप मुख्यमंत्री अजित पवार आज गडचिरोली जिल्ह्यात

 

 

गडचिरोली / दि.5: उप मुख्यमंत्री अजित पवार 06 सप्टेंबर 2024 रोजी  गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहतील.
दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता अहेरी येथे आगमन. सकाळी 11.15 वा. राजे धर्मवीर शाळा, रेड्डी कॉम्पलेक्स, अहेरी रोड, नागेपल्ली येथे रक्षाबंधन कार्यकम. सकाळी 11.45 वा. सावरकर चौक, आलापल्ली येथे आदिवासी बंधू-भगिनींमार्फत पारंपारिक नृत्य कार्यक्रम सादरीकरण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12 वा. वन विभागाचे मैदान, आलापल्ली येथे जनसन्मान यात्रा- शेतकरी व लाडक्या बहिणींशी संवाद. दुपारी 2.15 वा. राजवाडा निवासस्थान अहेरी येथे राखीव. दुपारी 3.20 वाजता नागपूरकडे प्रयाण.


PostImage

P10NEWS

Sept. 6, 2024   

PostImage

जिल्हा नियोजन बैठकीत विकास कामांसाठी मंजूर निधी तत्परतेने खर्च करण्याचे …



          जिल्हा नियोजनच्या खर्चाचा आढावाा.
100 दुर्गम गावात सौर विद्युत यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना.

 

     

      गडचिरोली/ दि.5: जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेने विकास कामांसाठी मंजूर केलेला निधी तत्परतेने खर्च करावा तसेच दुर्गम भागात विजेची समस्या निकाली काढण्यासाठी विद्युत विभागाने जिल्हा नियोजनच्या निधीतून किमान 100 दुर्गम गावात सौर विद्युत यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिल्या.
जिल्हा नियोजन अंतर्गत 2023-24 च्या खर्चाचा व 2024-25 च्या विकास कामांचा आढावा श्री दैने यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेतला. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय सचीव विद्याधर महाले, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रमेश यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. 
जिल्हाधिकारी दैने यांनी पुढे सांगितले की गडचिरोली हा जंगलव्याप्त आणि दुर्गम भाग असल्याने येथे विजपुरवठाच्या अनेक समस्या आहेत. वीज उपलब्ध करण्यासाठी वीद्युत निर्मिती संच उभारणे, दुर्गम भागात दुरवर वीजपुरवठ्याची लाईन टाकणे, बांधकाम करणे, वनक्षेत्राकरिता परवानग्या व इतर अडचणी सोडवणे, त्याची देखभाल दुरूस्तीसाठी कायम मनुष्यबळ उपलब्ध ठेवणे, सार्वजनिक वीज वापरासाठी रकमेची तजवीज करणे या सर्व बाबींवर सौर विद्युत यंत्रणा हा सर्वोत्तम पर्याय असून त्याच्या वापरारतून ज्या दुर्गम भागात अद्यापही वीज पोहचली नाही किंवा वीजपूरठ्यासाठी नेहमीच समस्या उदभवतात त्या सोडवण्यासाठी सौर यंत्रणा टप्प्याटप्प्यात बसवून दुर्गम भागातील वीजपुरवठ्याचा अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 
पालकमंत्री यांचे सचिव विद्याधर महाले यांनी जिल्ह्यातील विकास कामे पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री यांची सदैव आग्रही भूमिका असल्याचे त्यासाठी पालकमंत्र्यांनी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगितले. 
यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा नियोजनच्या निधीतून शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सोयी सुविधांचे निर्माण करणे, प्रत्येक शाळेत सिसिटीव्ही कॅमेरे लावणे, टेक्नोसेवी व डिजिटल शाळा तयार करणे, शालेय क्रिडांगणाचा विकास करणे, कौशल्य विकास विभागाने रोजगाराभिमुख अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करून त्यांना सक्षम करणे, जिल्ह्यात पर्यटनला चालना देण्यासाठी वन विभागाने विश्रामगृह बांधून पर्यटकांच्या राहण्याची सोय करणे आदी सूचना दिल्या. एटापल्ली वनविभागाने जिल्हा परिषदेच्या नवीन रस्ते बांधकामासंबंधी तक्रारी न करता नागरिकांची सोय लक्षात घेवून समोपचाराने मार्ग काढण्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी नरसिंहपल्ली येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी इमारत बांधकामाची आवश्यकता असल्याचे सांगून निवासस्थानाऐवजी दवाखाना बांधण्याकरिता प्राधाण्याने निधी वाढवून देण्याची विनंती केली.
    यावेळी कृषी, आरोग्य, वन, जलसंधारण, शिक्षण, नगरविकास, महिला व बालकल्याण, आदी विविध यंत्रणेच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. जिल्हा सर्वसाधारण वार्षिक योजना 2023-24 अंतर्गत 340 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. हा सर्व निधी 100 टक्के खर्च करण्यात आला आहे. तर 2024-25 साठी 406 कोटी निधी मंजूर करण्यात आला असून 135 कोटी 32 लाख रुपये निधी बीडीएस प्रणालीवर उपलब्ध झाल्याचे व त्यातील 54 कोटी 75 लाख निधी 31 ऑगस्टपर्यंत यंत्रणांना वितरीत केला असल्याचे आणि त्यापैकी 19 कोटी 66 लाख रुपये निधी खर्च झाला असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे यांनी सादर केली. 
    बैठकीला जिल्ह्यातील सर्व संबंधीत यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.


PostImage

P10NEWS

Sept. 6, 2024   

PostImage

जिल्हा परिषद येथील अनुकंपाधारकामधुन अंतर्गत गट-क व गट-ड रिक्त पदभरती …


 

जिल्हा परिषद येथील अनुकंपाधारकामधून अंतर्गत गट-क व गट-ड रिक्त पदभरती

 

 

      गडचिरोली/दिनांक,5: जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेले विविध संवर्गाची पदे अनुकंपाधारकामधून भरावयाच्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद, गडचिरोली अतर्गत सन २०२३ मध्ये पूर्ण झालेल्या अनुकंपा प्रकरणाची तपासणी करून पुर्ण माहिती असलेल्या एकूण २५१ उमेदवारांचा अंतिम जेष्ठता सुची तयार करून जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या www.zpgadchiroli.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे फलकावर प्रकाशित करण्यात आलेली होती. या कार्यालयाचे पत्र दिनांक २२ ऑगस्ट २०२४ राजा प्रकरण पूर्ण असलेल्या प्रतिक्षाधिन सूचीतील अनुक्रमांक ०१ ते १५० पर्यतच्या अनुकंपाधारक उमेदवारांचे दस्ताऐवजांची पडताळणी करण्यात आलेली आहे. त्यानुसार याव्दारे आवाहन करण्यात येते की. दिनांक १० सप्टेंबर २०२४ रोजी ठिक सकाळी ११.०० वाजता वर्ग-३ व वर्ग-४ च्या पदावर शैक्षणिक अर्हतेनुसार नियुक्ती संबंधाने समुपदेशन घेण्यात येणार आहे. तरी प्रकरण पूर्ण असलेल्या प्रतिक्षाधिन सुचीतील अनुक्रमांक ०१ ते १५० पर्यंतच्या उमेदवारांनी मुळ दस्ताऐवजांसह विर बाबुराव शेडमाके सभागृह, जिल्हा परिषद, गडचिरोली येथे समुपदेशानाकरीता उपस्थित राहावे. 
प्रतिक्षाधिन सुचीतील अनुकंपाधारकांची नेमणूक शैक्षणिक अर्हता तसेच सामाजिक प्रवर्गानुसार समुपदेशन प्रक्रियाव्दारे व पारदर्शकता ठेवून राबविण्यात येत असल्याने उमेदवारांनी कोणत्याही आमीषाला / भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन  मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांनी केले आहे.


PostImage

Zadipatti VC News and Business

Sept. 5, 2024   

PostImage

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांना सामाजिक संघटनांचे साकडे


गडचिरोली -:

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत विविध अध्यासन केंद्राचे काम सुरू झाले आहे.त्यांचेमार्फत नेहमी अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.परंतू आदिवासी अध्यासन केंद्र स्थापन झाले असुनही गोंडवाना विद्यापीठाला वारंवार पत्रव्यवहार करून,भेटी देऊन सुद्धा आदिवासींच्या व विशेषत महिलांच्या विकासासाठी अजुन कोणताही उपक्रम राबवलेला नाही.आदिवासी महिलांचे स्वतंत्र अध्यासनाची मागणी आदिवासी महिला संघटनांनी वारंवार केली.सतत भेटी चर्चा केल्या पण  त्याकडे दूर्लक्ष केले जाते यावर महिला संघटनांनी नाराजी व्यक्त केली.आदिवासी महिला विकासासाठी कार्यक्रम घेऊन  आदिवासी महिला अध्यासनाचे उद्घाटन व्हावे व आरोग्य शिक्षण रोजगार आर्थिक सामाजिक राजकीय स्थितीचे संशोधन व्हावे यासाठी मा कुलसचिव यांना निवेदन देण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ता प्रतिभाताई चौधरी, ज्योती मेश्राम महिला राजसत्ता आंदोलन समन्वयक, कुसुम ताई अलाम माजी जि प सदस्य तथा साहित्यिक, सुधाताई चौधरी, उपेंद्र रोहनकर अंधश्रद्धा निर्मूलन समिती,आशा ताई वेलादी, सुनिता उसेंडी उपस्थित होते.


PostImage

Zadipatti VC News and Business

Sept. 5, 2024   

PostImage

नाट्यश्री कविता स्पर्धेतील पस्तिसाव्या सत्रात पुरुषोत्तम दहिकर विजयी


 

             स्थानिक 'नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली' च्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.  या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.  या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते. 
           या उपक्रमाचे पस्तिसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ४१ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात गडचिरोली येथील कवी पुरुषोत्तम दहिकर यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या "जीवनाची संध्याकाळ " या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे,  व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 
          पुरुषोत्तम महादेव दहिकर हे गडचिरोली येथील रहिवासी असून सेवानिवृत्त बॅंक अधिकारी आहेत. ते
नवोदित कवी असून सेवानिवृत्तीनंतर वयाच्या उत्तरार्धात त्यांनी कविता लेखनास सुरुवात केलेली आहे. आजवर त्यांनी १०० च्या वर कवितांचे लेखन केलेले असून व्हॉट्सॲप व फेसबुकवर सातत्याने ते कवितांचे सादरीकरण करीत असतात. त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे.  
             त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.‌अरुण बुरे, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
        या पस्तिसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने संतोष कपाले,  प्रा. पंढरी बनसोडे, तुळशीराम उंदीरवाडे, जयराम धोंगडे,पुनाजी कोटरंगे, रविंद्र गेडाम,  संगीता ठलाल, पी. डी. काटकर,  प्रेमिला अलोने, लता शेंद्रे, रोहिणी पराडकर, संगीता रामटेके, वसंत चापले, सुरज गोरंतवार, डॉ. चंद्रकांत लेनगुरे, राजेंद्र यादवराव सोनटक्के,  नरेंद्र गुंडेली, राजरत्न पेटकर, भिमानंद मेश्राम, मुरलीधर खोटेले,  उकंडराव नारायण राऊत, वामनदादा गेडाम, सुभाष धाराशिवकर,  रेखा दिक्षित, खुशाल म्हशाखेत्री, रंजना चुधरी, ज्योत्स्ना बन्सोड, सोनाली रायपुरे, हरिष नैताम,  उत्तम प्र. गेडाम, मिलींद बी. खोब्रागडे,  गजानन गेडाम, शैला चिमड्यालवार, पुरुषोत्तम दहिकर, गणेश रामदास निकम,  विलास जेंगठे, मधुकर दुफारे, सुरेश गेडाम,  केवळराम बगमारे, मंदाकिनी चरडे इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
         या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे असे चुडाराम बल्हारपुरे यांनी कळवले आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Sept. 5, 2024   

PostImage

सावधान ! हत्ती आले खैरीच्या जंगलामध्ये


 मालेवाडा : कुरखेडा तालुक्यात मागील महिनाभरापासून वावर असलेला रानटी हत्तींचा कळप सध्या खैरी जंगल परिसरात दाखल झालेला आहे.

 

४ सप्टेंबर रोजी हत्तींच्या कळपाने खैरी जंगल परिसरात एन्ट्री केली. वनविभागाच्या ड्रोन कॅमेऱ्यात जवळपास ८ हत्ती दिसून आले. त्यामुळे उर्वरित हत्ती कोणत्या भागात आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. तरीसुद्धा नागरिकांनी या परिसरात एकटेदुकटे किंवा समूहानेसुद्धा जाऊ नये, असे आवाहन ग्रामपंचायतने केले आहे. सध्या हलक्या प्रतीचे धान पीक निसव्यावर आहे, तर मध्यम प्रतीचे धान

 

पीक जोमात वाढलेले असून तेसुद्धा काही आठवड्यात गर्भावस्थेत येईल. अशा स्थितीत या पिकांवर हत्ती ताव मारत असल्याचे दिसून येत आहे. हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

 

 


PostImage

Sanket dhoke

Sept. 4, 2024   

PostImage

चंद्रपुर जिल्ह्यात महिला अत्याचारांची वाढती घटना


Chandrapur:- चंद्रपुर जिल्ह्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, बल्लारपुर, वरोरा, दुर्गापुर आणि चंद्रपुरसारख्या ठिकाणी अनेक अत्याचार आणि बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


बल्लारपुरमध्ये दोन बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. यापैकी एका घटनेत एक मानसिक आजारी महिला आणि दुसऱ्या घटनेत एक तरुणी बलात्काराची शिकार झाली आहे. या घटनांमुळे बल्लारपुरमध्ये खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात शिक्षक, रेल्वे अधिकारी, खेल शिक्षक अशा विविध क्षेत्रातील लोकांनी महिलांवर अत्याचार केल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे समाजात महिलांची सुरक्षाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


पोलिसांनी या घटनांमध्ये काही आरोपींना अटक केली आहे. मात्र, महिलांवरील अत्याचारांच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिक कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमुळे समाजात महिलांची सुरक्षाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महिलांना सुरक्षित वातावरण प्रदान करण्यासाठी सरकार आणि समाजाला मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे.

 

अधिक वाचा :-  शाहरुख, सलमान या रजनीकांत नहीं ये Actor एक मूव्ही के २०० करोड फीस लेते हैं

अधिक वाचा :- Today Horoscope :- ४ सप्टेंबर २०२४ ; आज आप अपने दोस्तों के साथ वक्त गुजरेगे

अधिक वाचा :- अजय देवगन के 8 अफेयर्स : एक विवादित सच?

अधिक वाचा :- iPhone 15 Plus पर मिल रहा है 19 हजार रुपये का डिस्काउंट, जानें ऑफर

 

अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर  क्लिक करा.

 

⬇️

 

https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW

 

आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा

https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w

 

वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा

 

☎️ : ७७५८९८६७९८

 

जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Sept. 4, 2024   

PostImage

ढिवर कुटूंबांना मिळणार हक्काचे घरकुल ,भाई रामदास जराते यांच्या प्रयत्नांना …


 

गडचिरोली : शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके - विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते,महिला नेत्या जयश्रीताई जराते यांच्या पाठपूराव्यामुळे शासनाच्या घरकुल योजनेपासून वंचित असलेल्या ढिवर समाजातील ३५ कुटूंबांना वेअर हाऊस काॅर्पोरेशन, नवी दिल्ली यांच्या वतीने ढिवर मोहल्ला सुधार प्रकल्पा अंतर्गत घरकुल बांधून देण्यात येणार आहेत. 

 

जिल्ह्यातील ढिवर समाजाची असलेली बिकट परिस्थिती आणि शैक्षणिक मागासलेपणामुळे कागदपत्रांच्या अभावी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतांना येणाऱ्या अडचणींमुळे हा समाज विकासापासून वंचित आहे. सदर बाब लक्षात घेवून शेतकरी कामगार पक्षाचे आदिवासी, भटके - विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते, महिला नेत्या जयश्रीताई जराते यांनी मुंबई येथील सेंटर ऑफ ट्रान्सफार्मींग इंडिया या संस्थेला ढिवर समाजाच्या सदर परिस्थितीचा अभ्यास करण्याची विनंती केली होती. संस्थेच्या संचालिका आणि शेकापच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांनी त्यांचे पथक पाठवून गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांना भेटी देवून सर्वेक्षण केले असता ढिवर समाजाच्या दारिद्र्याचे भिषण वास्तव समोर आले. यात आरोग्य,शिक्षण, रोजगार यासोबतच निवासाची बिकट अवस्था लक्षात घेता संस्थेच्या वतीने ढिवर मोहल्ला सुधार प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पाला सेंट्रल वेअरहाऊस काॅर्पोरेशन, नवी दिल्ली यांचेकडून मंजूरी मिळाल्याने आता त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात गडचिरोली तालुक्यातील गुरवळा, मुडझा, काटली व चामोर्शी तालुक्यातील मोहुर्ली, सगणापूर, हळदी या गावातील गरजू ढिवर कुटूंबांना ३५ घरकुलांचे बांधकाम करुन देण्यात येणार आहेत. तसेच ढिवर मोहल्ला सुधार प्रकल्पा अंतर्गत लवकरच शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या योजनाही संस्थेच्या वतीने सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

 

सातत्याने पाठपुरावा करुन ढिवर मोहल्ला सुधार प्रकल्प आणि त्याअंतर्गत घरकुलांचा गरजूंना लाभ मिळवून दिल्याबद्दल सीएफटीआय च्या संचालिका चित्रलेखा पाटील, अमीत देशपांडे, प्रसाद मुनगेकर, शेकाप नेते भाई रामदास जराते आणि महिला नेत्या जयश्रीताई जराते यांचे भटके - विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डंबाजी भोयर, विनोद मेश्राम, मारोती आगरे, चंद्रकांत भोयर, रामदास दाणे, किसन साखरे, महेंद्र जराते, देवेंद्र भोयर, योगेश चापले, अशोक ठाकूर आणि घरकुल लाभार्थी व शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आभार व्यक्त केले आहे.


PostImage

P10NEWS

Sept. 4, 2024   

PostImage

पोस्टे अहेरी पोलिसांनी देशी व विदेशी दारूसह एकुण 9,35,500/- रुपयांचा …


   
                                                             


 

  गडचिरोली/ दिनांक, 03 :-  गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या पद्धतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. दिनांक 02/09/2024 रोजी बैल पोळा, तान्हा पोळा तसेच येत्या काही दिवसात असलेला गणेशोत्सव व इतर महत्वाचे सण शांततेत पार पाडुन उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होवू नये व पोस्टे हद्दीत अवैधरित्या चालणा­या धंद्यांवर आळा बसविण्याचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांचे अवैध दारु विक्री करणा­यावर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये दिनांक 02/09/2024 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे अहेरी येथील प्रभारी अधिकारी पोनि. स्वप्नील ईज्जपवार हे पोस्टेच्या स्टाफसह हद्दीतील अवैध धंद्यांवर आळा घालण्याकरीता पेट्रोलींग करीत असतांना मौजा कोलपल्ली तालुका अहेरी येथील आरोपी नामे 1) देवाजी निला सिडाम वय 34 वर्षे, 2) दिलीप रामा पोरतेट वय 28 वर्षे, 3) संपत पोच्चा आईलवार वय 38 वर्षे, सर्व रा. कोलपल्ली तह. अहेरी, जि. गडचिरोली हे त्यांच्या राहते घरुन देशी विदेशी दारुची अवैध विक्री करीत आहे. अशा मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन त्यांचे राहत्या घरी धाड टाकली असता, देशी विदेशी दारुसह एकुण 9,35,500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्यामध्ये, रॉकेट देशी दारु संत्रा कंपनीच्या 90 मिली मापाच्या एकुण 10,000 सिलबंद निपा किंमत 8,00,000/- रुपये, किंगफिशर स्टॉग बिअर कंपनीच्या 650 मिली मापाच्या एकुण 80 नग बॉटल किंमत 24,000/- रुपये, हेवड्र्स 5000 स्टॉग बिअर कंपनीच्या 650 मिली मापाच्या 230 नग सिलबंद बॉटल किंमत 57,500/- रुपये, ऑफिसर चॉईस कंपनीच्या 1000 मिली मापाच्या 54 नग सिलबंद बंपर किंमत 54,000/- रुपये असा एकुण 9,35,500/- (अक्षरी नऊ लाख पसतीस हजार पाचशे रुपये) रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला. संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोउपनि. सागर माने, पोस्टे अहेरी यांचे लेखी फिर्यादीवरुन पाहिजे असलेले आरोपी नामे 1) देवाजी निला सिडाम, वय 34 वर्षे, 2) दिलीप रामा पोरतेट, वय 28 वर्षे, 3) संपत पोच्चा आईलवार, वय 38 वर्षे, सर्व रा. कोलपल्ली तालुका अहेरी, जि. गडचिरोली यांचे विरुध्द पोस्टे अहेरी येथे अप क्र. 258/2024 कलम 65 (ई), 83 महा. दा. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश व उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोस्टे अहेरी पोनि. स्वप्नील ईज्जपवार यांचे नेतृत्वात, सपोनि. मंगेश वळवी, पोउपनि. सागर माने, पोउपनि. अतुल तराळे, पोहवा/1850 निलकंठ पेंदाम, नापोअं/5337 हेमराज वाघाडे, पोअं/5373 शंकर दहीफळे, मपोअं/8064 राणी कुसनाके, चापोहवा/2796 दादाराव सिडाम यांनी पार पाडली.


PostImage

Vaingangavarta19

Sept. 2, 2024   

PostImage

दुसऱ्याच्या घराची भिंत अचानक कोसळल्याने एका महिलेचा जागीच करुन अंत्य


दुसऱ्याच्या घराची भिंत अचानक कोसळल्याने एका महिलेचा जागीच करुन अंत्य 

 

 

सिंदेवाही : 
पर्जण्यवृषृटी खूप झाल्याने एका घराची भींत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे सदर घटना सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे घडली आहे 
मृतक रसिका देवराम मसराम वय,52 वर्ष ही सकाळी झोपून उठल्यावर अंगनाची सफाई करीत असतांना अचानक घरा शेजारील धुरपता वासुदेव मडावी यांच्या घराची भिंत  रसीका यांच्या अंगावर कोसळ्याने रसीका मसराम यांचा जागीच मृत्यू झाला.

यावर्षी रत्नापूर व परीसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्यामुळे घराच्या भिंत कोसळण्याचे प्रमाणही जास्तच आहे परंतु दुसऱ्याची भिंत कोसळ्याने आजस्थीतीत अंगणातील रशीका मसराम यांचा दुदैवी मृत्यू आज दि.1 सटेबर 2024 सकाळी 6.00 वा.चे दरम्यान झाला.
मोलमजुरी करुण आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या रशीका मसराम यांचा हा मृत्यु वेदनादायी आहे. या अचानक घडलेल्या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस,तलाठी,पोलीस पाटील यांनी उपस्थीत राहुन पंचनामा केला. 
त्यांचे मृत्यु पश्चात दोन मुली,एक मुलगा,नातवंड  असा बराच मोठा परिवार आहे.


PostImage

Sanket dhoke

Sept. 2, 2024   

PostImage

वरोरा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार: दोन आरोपी अटक, तालुक्यांतील दुसरी …


वरोरा :- वरोरा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पहिली घटना:
29 ऑगस्ट रोजी एका अल्पवयीन मुलीला शाळेत जात असताना यवतमाळ जिल्ह्यातील दोन युवकांनी रस्ता अडवून छेडखानी केली. पीडित मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींवर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


दुसरी घटना:
याच तालुक्यातील एका नामांकित शाळेत एका शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीला मिठी मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणीही पोलिसांनी कारवाई केली आहे.

पार्श्वभूमी:
तालुक्यात अशा प्रकारच्या घटनांची संख्या वाढत असून, विशेषतः ग्रामीण भागातील मुलींना अशा प्रकारच्या घटनांचा सामना करावा लागत आहे.


पोलिस कारवाई:
पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्वरित कारवाई केली आहे. दोन्ही घटनांमध्ये आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.


कायदा व न्याय:
या घटनांमुळे समाजात महिला सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सरकारने आणि समाजाने मिळून महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.

अधिक वाचा :- कार में बेहतरीन माइलेज कैसे पाएं? जानिए सही स्पीड

अधिक वाचा :- बैल पोळा: शक्ती आणि सौंदर्याचा उत्सव 

अधिक वाचा :- Today Horoscope :- २ सप्टेंबर २०२४ ; आज आपका दिन उत्साह और ऊर्जा से भरपूर होगा।

अधिक वाचा :- मूल तालुक्यात वाघाचा हल्ला: गुराखी ठार  

Read More :- 5 best motorcycle under 2 lakh with top features

अधिक वाचा :- वारोऱ्यातील विद्यार्थिनीचा विनयभंग प्रकरण : आरोपींना न्यायालयीन कोठडी, निषेध मोर्चा आणि आयोगाची भेट

अधिक वाचा :- मां की हत्या कर बेटे ने इंस्टाग्राम पर स्टोरी पोस्ट की, I'm Sorry Mom, miss you Mom...

अधिक वाचा :- विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या त्या दोन शिक्षकांना अखेर अटक

अधिक वाचा :- Warora News :- वरोरात शिक्षकांने केला विनयभंग: पोलिसांनी गुन्हा दाखल, निलंबित

अधिक वाचा :- महाराष्ट्राची हास्यजत्राच्या चाहत्यांना धक्का, कलाकार म्हणतात see you soon

अधिक वाचा :- Pushpa 2 :- अल्लू अर्जुन की 'पुष्पा- द रूल' की रिलीज डेट पक्की हो गई है। मेकर्स ने नए पोस्टर के साथ फिल्म की रिलीज डेट की घोषणा की है.

अधिक वाचा :- धर्म से मुस्लिम, लेकिन हिंदू देवी-देवताओं में गहरी आस्था रखते हैं; जानिए 'इस' एक्ट्रेस के बारे में! 

अधिक वाचा :- भारत की सबसे अमीर अभिनेत्री: 4600 करोड़ रुपये की संपत्ति, 15 सालों से कोई हिट नहीं, दीपिका, प्रियंका, आलिया, कटरीना, ऐश्वर्या से भी अमीर

 

अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर  क्लिक करा.

 

 ⬇️

 

https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW

 

आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा

 

https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w

 

वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा

☎️ : ७७५८९८६७९८

जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.